सावधान ! या यादी मधील पासवड तुम्ही ठेवला आहे का ? तर त्याला आहे हॅकर्सचा धोका

पुणे |आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आजची पिढी अग्रेसर असते. त्याच प्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सर्वांनाच आवड असते. मात्र तुमचा पासवड तुमचा पर्सनल डेटा लिक करू शकतो. त्यामुळे तुम्ही सावधानी बाळगा आणि खालील पासवड तुम्ही वापरत असाल तर तो पासवड त्वरित बदलून घ्या.

नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने केलेल्या संशोधनातून हे समोर आले आहे कि साधारता 123456 हा सर्वांच्या आवडीचा आणि सर्वाधिक वापरला जाणारा पासवड आहे.त्याच प्रमाणे 123456789 हा देखील पासवड ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हॅकर्स तुमचा पासवड सहज  हॅक करू शकतात. नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने जाहीर केलेल्या यादी मधील पासवड ठेवण्याचे टाळा आणि आपला  डेटा सुरक्षित ठेवा

हॅकर्सचा सर्वाधिक धोका असलेले पासवड 

123456
123456789
qwerty
password
111111
2345678
abc123
1234567
password1
12345

You might also like