…तर मी राम मंदिरासाठी सुद्धा देणगी देईल : रॉबर्ट वाड्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “मी जर एखाद्या चर्च, मशीद, गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर मी राम मंदिरासाठीही देणगी देईन… मी या सर्व धार्मिक स्थळांवर जातो, असं उत्तर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राम मंदिराला देणगी देणार का ? या एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलंय.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा शुकवारी राजस्थानमधील जयपूर शरात दाखल झाले होते. वाड्रा यांनी इथे मोती डुंगरी मंदिरात गणेशाची पूजा केली. देवाकडे आपण सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना केल्याचंही रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरंही दिली. राम मंदिर निर्माणासाठी गोळा केल्या जाणाऱ्या देणग्यांबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, की मी जर चर्च, मशीद किंवा गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर मला राम मंदिरासाठी देणगी द्यायला काहीच हरकत नाही. कारण या सगळ्या धार्मिक स्थानांवर मी जात असतो,असे उत्तर दिले.

दरम्यान, यावेळी त्यांना आपण राजकारणात सक्रीय व्हाल का ? प्रश्न देखील विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रॉबर्ट वाड्रा यांनी योग्य वेळ आल्यानंतर गरज पडली तर मीदेखील सक्रीय राजकारणात सहभागी होईन, असं उत्तर दिलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment