स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ | नाना पाटेकरांच्या भूमिकेने अप्रतीम कलाकृतीला उतरलेला तिरंगा जा देशभक्तीपर चित्रपट आज देखील राष्ट्रीय सणाच्या दिवशी टेलिव्हिजनवर प्रदर्शित केलाजातो. देशातील राजकारण आणि देशांतर्गत असणारे देशाचे शत्रू त्यांचा विमोड करण्यासाठी सज्ज असणारी येथील प्रशासन यांची हकीकत सांगणारा तिरंगा चित्रपट आहे. मात्र हा चित्रपट भारत जेवढा गाजला तेवढाच पाकिस्तानचा सर्वच मोठा प्रदेश असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये गाजला. त्याच कारण एकच या चित्रपटात नाना पाटेकरांचा डायलॉग. तो डायलॉगचं येथील बलुची मराठ्यानांना चित्रपटाकडे घेऊन आला.
“मराठा मरता नही, मारता है” हा डायलॉग बलुची मराठ्यांना एवढा आवडला की त्यांनी अक्षरश: त्याकाळी चित्रपटगृह डोक्यावर घेतली. नाना पाटेकरांच्या तोंडातून हा डायलॉग बाहेर येताच प्रेक्षागृहात असणाऱ्या बलुची मराठ्यांमध्ये मोठा उत्साह संचारायचा आणि लोक शिट्ट्या आणि टाळ्यांनी मोठा कल्लोळ उभा करायचे. काय आहेत याची कारणे? कोण आहेत हे बलुची मराठे?
बलुची मराठ्यांचे मूळ महाराष्ट्रात आहे. पूर्वीच्या काळी मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाला उत्तरेत मराठा असे संबोधले जात होते. १४ जानेवारी १७६१ साली मराठा आणि अहमदशा अब्दाली यांच्यात झालेले युद्ध मराठे हारले. या युद्धाला पानिपतचे ३ रे युद्ध असे संबोधले जाते. या युद्धाची दाहकता एवढी होती की महाराष्ट्राची एक पिढी या युद्धात गायब झाली. तर मराठा साम्राज्य देखील बराच काळ उभारी खाऊ शकले नाही. त्याच प्रमाणे जे लोक यावेळी युद्धाला भिवून जवळच्या जंगलात जाऊन लपले आणि युद्ध संपल्यानंतर तिथेच शेती करून गुजराण करू लागले ते आज हरयाणामध्ये रोड मराठा या नावाने ओळखले जातात. तर जे २२ हजार लोक अहमदशा अब्दालीने युद्ध कैदी म्हणून आपल्या सोबत नेहले ते बलुची मराठा म्हणून ओळखले जातात.
अहमदशा अब्दाली पानिपत जिंकून सुद्धा हारला होता. कारण या युद्धातून त्याला कसलीच रोख स्वरूपात रक्कम अथवा सोने चांदी हिरे मोती अशी काहीच लूट मिळाली नव्हती. म्हणून त्याला त्याचेच सैन्य त्याच्या मायदेश अफगाणिस्तान पर्यंत घेऊन जाणे कठीण झाले होते. म्हणून त्याने डेरा बुगटी या बलुचिस्तान मधील भागात येताच तेथील राजा , कलात सल्तनतीचा राजा नासिरखान नुरी यास २२ हजार मराठा युद्ध कैदी भेट म्हणून दिले. ही भेट देण्याचे कारण म्हणजे बलुची राजा नुरी हा पानिपतच्या युद्धात अब्दालीच्या बाजूने लढला होता. म्हणून त्याला २२ हजार युद्ध कैदी भेट म्हणून दिले. हेच लोक आज बलुची मराठा म्हणून उदय पावले आहेत. त्यांनी पाकिस्तानमधून वेगळ्या बलुचिस्तान राष्ट्राची मागणी केली आहे. मराठ्यांनी एवढ्या दूर जावून देखील अद्याप आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. त्यांना आज हि मराठा असण्याचा गर्व आहे. तसेच ते आईला आई म्हणूनच आजही संबोधता. तसेच महाराष्ट्रात अढळणारीस्त्रियांची नावे कमल, गोदा, सुभ्रदा आदि नावे बलुची मराठा बायकांमध्ये देखील आढळतात. म्हणून मराठा मरता नही मारता है हा डायलॉग नाना पाटेकर यांच्या तोंडून ऐकताच बलुची मराठ्यांची छाती आपल्या प्रमाणेच गर्वाने फुलून आली. म्हणून तिरंगा चित्रपट भारताप्रमाणे पाकिस्तानात देखील गाजला.