जळगाव प्रतिनिधी | भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा अल्पसंख्याक समाजातर्फे सावदा येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिल्याने मी काहींसाठी आवडेनासा झालोय.’
एकनाथ खडसे यांनी उदयॊगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आज त्यांची अशी अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. हडपलेल्या जमिनी सरकारजमा करण्याचा निर्णय काहींना रुचला नाही. आगामी निवडणूक लढवून आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, मात्र त्यांची ही इच्छा कोणालाच आवडली नाही.
एक मोठ्या व्यक्तीने मुस्लिम समाज्याच्या जमिनीवर बांधलेले घर जमीनदोस्त करून ती जमीन सरकार जमा करण्याचे आदेश आपण दिले होता. मात्र ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून उद्योजक अंबानी होते. त्यांनी अनाथाश्रमाच्या जागेवर आपले निवासस्थान उभारले होते. वास्तविक ती जमीन अल्पसंख्यांक समाजाची असल्याने त्यांना मिळायला हवी होती, त्यामुळे ती जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो निर्णय कोणालाच रुचला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्यावर आज ही वेळ अली आहे असा आरोप खडसे यांनी केला.
इतर महत्वाचे –
‘म्हणून’ गोकुळ दूध संघावर आयकर खात्याचा छापा…