महागाईचा दणका!! साबण, शाम्पूसह ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने संपूर्ण देशात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे, गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे दर वाढल्याने जनता आर्थिक संकटात असतातच आता तर चक्क बाथरूम पर्यंत महागाईची झळ बसणार आहे. याचे कारण म्हणजे आता अंघोळीचा साबण, आणि शाम्पूचे दर वाढणार आहेत.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या देशातील सर्वात मोठी FMCG कंपनीचे साबण, शाम्पू, पावडर आदी उत्पादने महागली आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. याशिवाय कॉफी, केचप, टूथपेस्टच्या किमतीत 4 ते 13 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे इथून पुढे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार हे मात्र नक्की.

जानेवारीपासून चौथ्यांदा कंपनीची उत्पादने महागली  

अहवालानुसार, हिंदुस्तान युनिलिव्हरने 125 ग्रॅम पिअर्स साबणाची किंमत 2.4 टक्क्यांनी वाढवली आहे, तर लक्स साबणाच्या मल्टीपॅकच्या किमतीत 9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे सनसिल्क शाम्पूच्या किमतीतही 8 ते 10 रुपयांनी वाढ केली आहे. , क्लिनिक पल्स शॅम्पूच्या 100 मिली पॅकच्या किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त स्किन क्रीम ग्लो अँड लव्हलीच्या किमतीत 6 ते 8 टक्के वाढ झाली आहे. जानेवारीपासून चौथ्यांदा कंपनीची उत्पादने महागली आहेत.

कॉफी महागली

केवळ साबण आणि शाम्पूच नव्हे तर हिंदुस्तान युनिलिव्हरने उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढवल्या आहेत. हॉर्लिक्सपासून ते ब्रू कॉफीपर्यंत या श्रेणी आहेत. हॉर्लिक्स, कॉफीपासून किसान केचपपर्यंतच्या किमती 4 ते 13 टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment