वॉशिंग्टन । सोशल मीडिया कंपनी फेसबुक देखील तालिबानच्या विरोधात मोठ्या कारवाईची तयारी करत आहे. कंपनीने म्हटले आहे की,” ते तालिबानच्या व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घालणार आहेत, कारण ते त्यांना दहशतवादी संघटना मानतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तालिबान्यांना रोखण्यासाठी फेसबुक अफगाण तज्ञांची मदत घेईल. फेसबुकने ‘डेंजरस ऑर्गनायझेशन पॉलिसीज’ अंतर्गत तालिबानला त्यांच्या सर्व सर्व्हिसवर बंदी घातली आहे. तालिबानने कंपनीच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने म्हटले आहे की,”अमेरिकेच्या कायद्यांतर्गत तालिबानवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालण्यात आली आहे. यामुळे कंपनीला अमेरिकेचे निर्बंध स्वीकारावे लागतील. AFP ला दिलेल्या मुलाखतीत फेसबुकने म्हटले आहे की, “यामध्ये तालिबानचे अधिकृत खाते म्हणून सादर होणाऱ्या खात्यांवर बंदी घालणे देखील समाविष्ट आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील बदलत्या परिस्थितीबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांकडून आणखी माहिती मागवत आहोत.”
कंपनी म्हणाली,” याचा अर्थ असा की, आम्ही तालिबान किंवा त्यांच्या वतीने तयार केलेली खाती काढून टाकू आणि त्यांची प्रशंसा, समर्थन आणि प्रतिनिधित्व थांबवू. यासह, कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, ही पॉलिसी त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर लागू होईल.”
फेसबुकने म्हटले आहे की, त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर तालिबान आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व कंटेन्टवर बंदी घातली आहे, कारण ते या गटाला दहशतवादी संघटना मानतात. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे बंडखोर गटाशी संबंधित साहित्याचे निरीक्षण करण्यासाठी आणि ते काढण्यासाठी अफगाण तज्ञांची एक डेडिकेटेड टीम आहे. वर्षानुवर्षे तालिबान आपले मेसेज पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानच्या प्रवक्त्याने फेसबुकने लावलेल्या बंदीला विरोध केला आहे. फेसबुक व्यतिरिक्त, अल्फाबेट कंपनीच्या यूट्यूबने देखील त्या अकाउंट्सवर बंदी घातली आहे जी तालिबानद्वारे किंवा त्यांच्या वतीने चालवली जात असल्याचे मानले जात होते.