राज्यपाल नियुक्त जागेसाठी एकनाथ खडसेंचा पत्ता कट? ‘हे’ प्रकरण ठरणार कारणीभूत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्या म्हणाल्या, ”प्रसारमाध्यमात राज्यपाल नियुक्तीसाठी १२ नावं गेलेली आहेत, त्यातलं एक नाव एकनाथ खडसे आहे अशा बातम्या येत आहेत, मात्र खडसेंचे नाव येणं हे संतापजनक आहे, भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा राजकारणात राष्ट्रवादी आणू पाहतेय, त्यांच्याविरोधात निवेदन देण्यासाठी मी राज्यपालांची भेट घेतली. भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला खडसेंसारखे नेते पुन्हा राजकारणात आले आणि सक्रीय झाले तर काहीच अर्थ राहणार नाही, त्यामुळे माझे निवेदन आणि कागदपत्रे राज्यपालांना दिली आहेत” असं त्यांनी सांगितलं.

याशिवाय एकनाथ खडसे जे भाषा वापरतायेत त्याबद्दल मी राज्यपालांना निवेदन दिलं आहे. राष्ट्रवादी प्रवेशावेळी जे शब्द वापरले “बाई दिली नाही तर मागे लावली” असं विधान शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुप्रिया सुळे असताना असं केले गेले. एकनाथ खडसेंना काही लाज आहे की नाही?, त्यांच्या या विधानानंतर मी शरद पवार, सुप्रिया सुळेंना मेसेज केला, शरद पवारांचा मला फोन आला खडसेंनी तुमचं नाव घेतलं नाही असं डिफेन्ड केले, पण माझं सोडा, पण कोणत्याही बाईबद्दल असं विधान करणं हे योग्य वाटतं का? असा सवाल मी शरद पवारांना केल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच आजतागायत एकनाथ खडसेंच्या विधानावर पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे भविष्यात कोर्टाची लढाई लढावी लागणार आहे. तत्पूर्वी राज्यपालांकडे मी निवेदन दिलं आहे. राज्यपालांना आणखी काही पुरावे देणार आहे असं त्यांनी सांगितले.

खडसेंची बाजू
‘एका महिलेने विनयभंगाची खोटी तक्रार माझ्याविरुद्ध केली होती. अंजली दमानिया यांनी माझ्यावर हा आरोप लावला, त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात जाऊन रात्रभर गोंधळ घातला. याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेथील पोलीस निरीक्षकांनीच मला याबाबत माहिती दिली, ते म्हणाले स्वत: मुख्यमंत्र्यांनीच गुन्हा दाखल करायला सांगितलंय. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांच्याकडे जाऊन यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी, त्या महिला रात्रभर गोंधळ घालत होत्या, त्यामुळे गुन्हा दाखल करायला लावलं. पुन्हा मागे घेऊयात, असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. याप्रकरणामुळे माझी मोठी बदनामी झाली, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरुद्ध राजकारण केलं गेलं, म्हणून मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं खडसेंनी सांगितलं होतं.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment