पंढरपुरमध्ये ‘या’ काळात करण्यात येणार दारुबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर शहर पुन्हा एकदा झगमगताना दिसणार आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी राज्यातील लाखों भाविक पंढरपूरला दाखल होणार आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहरात कार्तिक यात्रेदरम्यान मद्य विक्रीवर बंदी (Ban on sale of liquor) घालण्यात आली आहे.

सार्वजनिक शांतता राहावी यासाठी 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरात मद्य विक्रीवर बंदी (Ban on sale of liquor) घालण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश दिले आहेत. याशिवाय जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

कोरोना संकट काळात लाखो वारकऱ्यांना आपल्या विठुमाऊलीचं प्रत्यक्ष दर्शन घेता आलं नव्हतं. पण आता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे लाखो भाविक या एकादशी निमित्त पंढरपूरामध्ये दाखल होत असतात. राज्यभरातून भाविकांच्या शेकडो दिंड्या आता पंढरपुरात येत असतात. त्यामुळे या भक्तीमय वातावरणात कोणतीही अनुसूचित घटना घडू नये, शांततेचा भंग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय (Ban on sale of liquor) घेण्यात आला आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?