सोलापूरमध्ये प्रसिद्ध डॉक्टरकडून वृद्धाला बेदम मारहाण,CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका वृद्धाला एका प्रतिष्ठित डॉक्टरने काठीने बेदम मारहाण (beaten a old man) केली आहे. हि संपूर्ण मारहाणीची (beaten a old man)घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अंगावर खरकटे पाणी का टाकले? याचा जाब विचारल्याने डॉक्टरने फायबर काठीने वृद्धाला बेदम मारहाण (beaten a old man) केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके असे मारहाण (beaten a old man) करणाऱ्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे तर विजय चौधरी असे गवंडी कामगार असलेल्या पीडित व्यक्तीचे नाव आहे. डॉक्टरांनी केलेल्या मारहाणीत (beaten a old man) चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडले आहेत. या मारहाणीबाबत (beaten a old man) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी डॉक्टर संदीप आडके यांच्या विरोधात भादवी कलम 323, 324 504, 506 अंतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संदीप आडके यांनीही पीडित व्यक्तीविरोधात सदर बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

काय घडले नेमके?
विजय चौधरी हे रस्त्यावरुन जात होते. यावेळी डॉक्टर आडके यांच्या हॉस्पिटलमधून त्यांच्या अंगावर कुणीतरी खरकटं पाणी टाकलं. यानंतर पीडित विजय चौधरी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना जाब विचारला. मात्र डॉक्टरने चौधरी यांना फायबरच्या काठीने बेदम मारहाण (beaten a old man) केली असा आरोप चौधरी यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही बाजूकडून तक्रार दाखल झाल्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे पण वाचा :
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे
राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात
सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?
पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल