पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वशी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. संजय चौगुले असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या 37 वर्षीय पतीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीचा काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात
संजय चौगुले यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी मोठा अपघात (suicide) झाला होता. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तिच्या उपचारासाठी जास्त पैसे खर्च होत होते. यामुळे पत्नीच्या उपचारासाठी संजय यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते.

पत्नीचे आजारपण आणि कर्ज यामुळे चिंतेत होते
एवढा पैसा खर्च करुन उपचार करुनही पत्नीच्या प्रकृतीत सुधारण होत नव्हती. तसेच डोक्यावरील कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढत चालला होता. संजय चौगुले यांच्या समोरील संकटे थांबायची नाव घेत नव्हते. त्यामुळे चौगुले सतत चिंतेत असायचे.

नैराश्येतून चौगुलेंची आत्महत्या
पत्नीही बरी नव्हती आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा या सगळ्यांना वैतागून अखेर चौगुले यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राहत्या घराच्या शेजारी असलेल्या शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्यचा (suicide) शेवट केला.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!