Monday, February 6, 2023

सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तारांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात तीव्र राजकीय पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांचे कान टोचले आहेत तसेच त्यांना सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारलं आहे. सत्तार यांना त्यांच्या वक्तव्यावर माफी मागण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच शिंदेनी आपल्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रवक्त्यांना माध्यमांशी कोण बोलणार यावर चर्चा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलंच रान उठवलं आहे. राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांचा निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करत काचाही फोडल्या.

अब्दूल सत्तार नेमकं काय म्हणाले-

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तार यांच्यावर ५० खोक्या वरून टीका केली होती. त्याबाबत आज एका वृत्तवाहिनीने सत्तार यांना विचारलं असता त्यावर उत्तर देताना त्यांची जीभ घसरली. . इतकी भिकार– झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ अशी शिवीगाळ त्यांनी केली. सत्तार यांच्या विधानाचे जोरदार पडसाद राज्यभर उमटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा त्यांची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.