सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आज मोहोळ तालुक्यातील पेनुर हद्दीत आढळला आहे. एका दिवसात सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आकाराने वाढले असून मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या पाच झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मृत्यू झालेल्या सत्तावन वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सारी ची लक्षणे दिसत असल्याने या महिलेला चोवीस एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
आज नव्याने सापडलेल्या अकरा रुग्णामध्ये सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरातील दोन, तेलंगी पाछा पेठ परिसरातील एक, कुर्बान हुसेन नगर मधील एक, नइ जिंदगी परिसरातील एक, कर्णिक नगर परिसरातील एक, यशवंत सोसायटी परिसरातील एक, सोरेगाव येथील एसआरपी कॅम्प परिसरातील एक, आयकर कॉलनी परिसरातील एक, सोलापुरातील तालुका पोलिस ठाण्याच्या परिसरातील एक व मोहोळ तालुक्यातील पेनुर परिसरातील एक अशा अकरा रुग्णांचा समावेश आहे. पंचवीस एप्रिल रोजी महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील एक हजार नउशे सत्तर व्यक्ती सध्या होम क्वारंटाइनमध्ये असून इंस्टीट्यूट क्वारंटाइनमध्ये सातशे चवतीस जण आहेत. आयसोलेशन वार्डातील बाराशे अठ्ठावीस जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एक हजार बावन्न जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यातील नउशे एक्क्यानव जणांचे रिपोर्ट आले असून त्यातील एकसष्ट जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. एकशे शहात्तर जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित छप्पन जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.