सोलापूरमध्ये सर्वधर्मीय महिलांनी एकत्र येत साजरी केली शिवजयंती;15 हजार महिलांचा समावेश

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरमध्ये शिवाजी चौकात शिवजयंतीनिमित्त भव्य अशी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. याठिकाणी सर्वधर्मीय महिलांनी शिवजयंती उत्सहात साजरी केली. या उत्सवात 15 हजार पेक्षा अधिक महिलांचा समावेश होता.

रात्री 12 वाजता तब्बल 15 हजार महिलांनी शिवजनामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवून शिवजयंतीला सुरुवात केली. यामध्ये हिंदू-मुस्लिम असा कुठलाच भेदभाव न ठेवता सर्व महिला पारंपरिक वेशभूषेतील महिला महाराजांच्या पाळण्यात सहभागी झाल्या होत्या.त्याचबरोबर देशसेवेसाठी सोलापूर जिल्ह्यातून जे जवान शाहिद झाले आहेत. त्या कुटुंबातील ‘वीर पत्नी, वीर माता आणि वीर कन्ये’ला या पाळण्याला हलवण्याचा पहिला मान देण्यात आला आहे.

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून ‘आई तू जिजाऊ’ या संकल्पनेला समोर ठेऊन सोलापुरात पहिल्यांदाच हा पाळणा सोहळा पार पडला आहे. मागच्या 55 वर्षापासून हे मंडळ शिवजयंती साजरी करतय, मात्र यंदाची शिवजयंती महाराजांच्या पाळण्यामुळे अगदी खास ठरलीय हे मात्र नक्की!

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here