परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्यात महावितरण मार्फत शेतीला विनाव्यत्यय वीज पुरवठ्यासाठी अनुदानित स्वरूपात दिलेल्या सौर पंपाच्या प्लेटच चोरीला जाण्याची घटना घडली असून याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पाथरी पोलीस . ठाण्यात गुन्ह्याची नोंद दाखल झालाय . सौपंपाचा ५ वर्षाचा विमा असला तरी चोरीच्या या घटनेनंतर शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
शेतीसाठी शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी अनुदानित योजनेत मुख्यमंत्री सौरपंपाचे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतेक गावातील शेतामध्ये हे पंप बसवण्यात आले आहेत. परंतु आता या सौरपंपा वर चोरट्यांचा डोळा गेला असून पाथरी तालुक्यातील रामपूरी खुर्द येथील शेतकरी अरविंद गणपतराव वडकर (वय ५०) यांच्या मालकीच्या शेत गट २५२ मध्ये बसवण्यात आलेल्या टाटा कंपनीच्या सौर पंपाच्या दोन प्लेट ज्यांची किंमत २३६०० रुपये आहे चोरीला गेल्या आहेत.
सदरील गटात या शेतकऱ्याला चाडेचार एकर शेती आहे.त्यामध्ये मागील वर्षी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत नोंदणी व निवड झाल्यावर त्यांनी शेतकरी हिश्याची १० % रक्कम १६५६० रुपये महावितरणकडे भरणा केला होता. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी टाटा सोलार कंपनीचा सौरसंच बसवण्यात आला होता. दरम्यान मंगळवार १४ जुलै रोजी सदरील शेतकरी शेतात दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी घरी गेला होता. बुधवार १५ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. जेंव्हा शेतातील कामकाज करण्यासाठी सदरील शेतकरी गेला असता सौरपंपाच्या चौकटीतून दोन सौरप्लेट चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शेतातील सौरपंपाच्या प्लेट चोरीला जात असल्याच्या घटनेनंतर या योजनेतील शेतकरी चिंतेत पडले आहेत.दरम्यान शेतकरी अरविंद वडकर यांच्या फिर्यादी वरुन गुरुवार १६ जुलै रोजी पाथरी पोलीसात अज्ञात चोरा विरोधात भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पाथरी पोलीस तपास करीत आहेत.