नवी दिल्ली |निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ भाषण देण्यासाठी भाषण करत असलेल्या सुजय विखे पाटील यांनी शिर्डीचा रखडलेला प्रश्न आज लोकसभेत मांडून त्या प्रश्नाकडे सर्वांचे तसेच दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे देखील लक्ष आकर्षित केले आहे. पुणे शिर्डी आठ पदरी रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी आज संसदेत केली आहे.
शिर्डी हि सांस्कृतिक आणि धार्मिक भूमी आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आपण पुणे शिर्डी ८ पदरी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी सुजय विख पाटील यांनी आज केली. देशात रस्त्यांची जी कामे होत आहेत त्याबद्दल नितीन गडकरी यांचे सुजय विखे पाटील यांनी आभार मानले. त्याचप्रमाणे कल्याण ते हैद्राबाद सीमेपर्यंत असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ याच्या निर्मितीसाठी लवकरात लवकर जमीन हस्तांतरित करण्यात यावी. त्याच प्रमाणे या महामार्गादरम्यान येणाऱ्या एका फ्लायओव्हरचे काम लवकरात लवकर करावे म्हणजे येथील ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल असे सुजय विखे म्हणाले आहेत.
शिर्डीचा प्रश्न मांडताना सुजय विखे म्हणले, अध्यक्षजी आपण शनिवारी आणि रविवारी शिर्डीला येऊन बघा या दिवशी शिर्डीला येणाऱ्या भावीकांची संख्या खूप आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी शिर्डी पुणे रस्ता ८ पदरी करण्यात यावा कारण पुण्यावरून शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे असे सुजय विखे म्हणाले आहेत.