बळीराजा संघटनेचे लेटरपॅड, बिल्ला वापरून काहींनी दुकानदारी सुरू केली होती : बी. जी. पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

संघटना आणि प्रामाणिकपणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चूक ते चूक व बरोबर ते बरोबर हे चळवळीचे शास्त्र आहे. टेंडर, बिल निघण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केला जात होता. लेटरपॅड, बिल्ला वापरून काहींनी दुकानदारी सुरू केली होती, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी विरोधातील लोकांवर लावला आहे.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, उपाध्यक्ष उत्तमराव खबाले यांच्याह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कराड उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिले आहेत. त्या निवेदनात म्हटले आहे, बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये काही कार्यकर्त्यांनी संघटनेच्या विरोधात व संघटना फोडण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे त्या कार्यकर्त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलेली होती. त्या कार्यकर्त्यांनी बळीराजा शेतकरी संस्था या बोगस नावाने नोंदणी केलेली आहे. त्या संस्थेचा आणि बळीराजा शेतकरी संघटनेचा काडीमात्र संबध नाही. तरीसुध्दा संघटनेचे लेटरपॅड, बिल्ला चुकीच्या पध्दतीने वापर करत आहेत. तरी त्यांना समक्ष बोलावून समज द्यावी. त्यामधील साजिद मुल्ला व सुनील कोळी यांना समज द्यावी. यापुढील काळात संघटनेच्या नावाचा वापर केल्यास त्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.

पंजाबराव पाटील म्हणाले, बळीराजा शेतकरी संघटनेची पहिली पत्रकार परिषद ही संघटनेच्या प्रश्नावर होत आहे. कोणतीही शेतकरी संघटना रजिस्टर (नोंदणी) होत नाही. संघटनेच्या वादामुळे चळवळ बदनाम झाली. आम्ही कोणाची हकालपट्टी केली नव्हती. परंतु विरोधातील लोकांनी पंढरपूरला आमची हकालपट्टी केली, असल्याचे म्हटले. वर्षभरात मी केंद्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नव्याला संधी देणार आहे.

Leave a Comment