महाविकास आघाडीमध्ये वाद व्हावेत याची काही लोक वाट बघत आहेत- बाळासाहेब थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना राष्ट्रवादीनं फोडल्यानं शिवसेना नाराज असल्याचंही वृत्त समोर आलं होत. मात्र, यावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचं वृत्त बाळासाहेब थोरात यांनी फेटाळून लावलं आहे.

“महाविकास आघाडीत कोणताही वाद सुरू असण्याचा प्रश्नच नाही. आमच्यामध्ये वाद व्हावेत म्हणून काही लोक वाट बघत आहेत. ते अशा प्रकारचा प्रचार करण्याचं काम करत आहे. पण, हा प्रसार सोडला तर कसलाही वाद नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे आणि आम्ही सर्व एकत्र आहोत,” असं थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, राज्य आर्थिक संकटात असताना शिक्षण मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या प्रकरणावरही थोरात यांनी भाष्य केलं. “वाहन खरेदीची वृत्त पूर्ण माहितीच्या आधारावर देण्यात आलेलं नाही. सहा वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. पण, एक वाहन खरेदीचाच प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे,” असं थोरात म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment