काही लोकं फक्त फोटो काढण्यासाठी येतात, अब्दुल सत्तार यांची ठाकरेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – आज औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. शिवाय संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) उपस्थित होते. जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत सप्टेंबरमध्ये मिळाली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. नुकत्याच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. कॅबिनेटमध्ये यासंदर्भातील निर्णय होईल असे ते यावेळी म्हणाले.

अब्दुल सत्तारांची ठाकरेंवर टीका
एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे भूमिपुत्र आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. काही लोकं फक्त फोटो काढण्यासाठी आपल्या तालुक्यात येतात. आदित्य ठाकरे हे अंधारात आले. काय पाहिले असेल माहीत नाही. सत्तेत असताना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. सत्ता गेल्यापासून बाहेर पडू लागलेत असा टोला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावेळी लगावला .

उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा तीनपट पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. सत्ता गेल्यानंतर यांना बांधावर जाण्याची आठवण येऊ लागली. सर्व गोष्टी पाहिल्या तर शेतकऱ्यांना मदत करणारे हे राज्य सरकार आहे. या सरकारनं सर्व शेतकरी, शेतमजूर यांची दिवाळी साजरी व्हावी, यासाठी प्रयत्न केले असे म्हणत त्यांनी (Abdul Sattar) सरकारचे कौतुकदेखील केले आहे.

हे पण वाचा :
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे
राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात
सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?
पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल