काही ट्यूबलाईट अशा असतात …पंतप्रधान मोदींनी राहूल गांधींची उडवली खिल्ली

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरु असून, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली होती. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘तरुण-तरुणी सहा महिन्यांत मोदींना काठ्यांनी मारतील’ असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे.काही ट्यूबलाईट असतात अशा… असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीची खिल्ली उडवली आहे.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींनी काही दिवसांनी देशातील तरुण दांडक्यांनी मारहाण करतील असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा मोदींनी चांगलाच समाचार घेतला. राहुल यांचा थेट उल्लेख न करता, “काँग्रेसचा एक नेता म्हणाला की, सहा महिन्यांत तरुण मोदींना दांडक्यांनी मारणार. असं असलं तर मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करून स्वतः दांडकाप्रुफ करून घेईल,” अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली. यानंतर सभागृहातील भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार हसू लागले.

“मला दांडक्यांनी मारणं हे काम थोड अवघड आहे. त्यासाठी सहा महिने तयारी करावी लागेल. त्यामुळे पुढील सहा महिन्यात सूर्यनमस्कारांची संख्या वाढवण्याचं मी सुद्धा असं ठरवलं आहे. असं मोदी म्हणाले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here