तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेसबुक हे सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय अँप आहे. फेसबुकच्या माध्यमातून आपण जगाच्या कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्ती सोबत कनेक्ट होऊ शकतो, मित्र बनवू शकतो आणि आपले फोटो व्हिडिओ फेसबुकच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांना शेअर करू शकतो. पण कधी कधी आपलं अकाउंट दुसऱ्या कोणाच्या मोबाईल मध्ये लॉग इन राहिलेलं असू शकत किंवा आपलं अकाउंट दुसरच कोणी वापरत नाही ना? अशीही शक्यता निर्माण होऊ शकते. परंतु आज आपण जाणून घेऊया आपलं अकाउंट दुसरं कोणी वापरत आहे का ते कस शोधायचं याबाबत….

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे फेसबुक अकाउंट दुसरे कोणी चालवत असेल तर तुम्ही सहज शोधू शकता. तुमचे Facebook खाते कोणत्या डिव्हाईसवर लॉग इन केले आहे ते तपासणे आवश्यक आहे. कंपनी ही सुविधा देते. याच्या मदतीने तुम्ही तुमचे फेसबुक अकाउंट कोणत्या डिव्हाईसवर लॉग इन केले आहे हे सहज शोधू शकता.

यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर फेसबुक अकाउंट ओपन करावे लागेल. यानंतर, वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन-लाइन चिन्हावर क्लिक करा. Unknown Device काढून टाका यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून सेटिंग्ज पर्यायावर जावे लागेल. यावर टॅप करा. यामध्ये तुम्हाला पासवर्ड आणि सिक्युरिटीचा पर्यायही मिळेल. यावर टॅप करा. येथे तुम्हाला login device चा पर्याय मिळेल. यामध्ये, तुम्ही C All पर्यायातून सर्व लॉगिन उपकरणांची यादी पाहू शकता.

हे एक्टिव डिव्हाइसबद्दल सांगते. येथे तुम्हाला डिव्‍हाइसच्‍या नावाच्‍या शेजारी तीन ठिपके असलेला उभा आयकॉन देखील दिसेल. याच्या मदतीने तुम्ही कोणतेही डिव्हाइस लॉगआउट करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित करू शकता. हे डिव्हाइसचे नाव आणि लोकेशन दाखवते . म्हणजेच जर दुसऱ्या कोणाच्या मोबाईलमध्ये फेसबुक अकाउंट लॉगिन असेल तर त्याच्या माहितीसोबत त्यांच्या लोकेशनचीही माहिती दिली जाते. परंतु एक्झॅक्ट लोकेशन दिसत नाही.