सोलापूर प्रतिनिधी । करमाळा तालुक्यातील मलवडी इथं बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. शिवाजी कोंढलकर हे आपल्या मुलाला विहरीत पोहायला शिकवत होते. या दोघांचाही विहरीत बुडून मृत्यू झाला.
शिवाजी भीमराव कोंढलकर आणि सोनू शिवाजी कोंढलकर अशी या बापलेकांची नाव आहेत. शिवाजी हे मलवडी येथील दुर्गुळे कोंढलकर वस्तीवरील आपल्या विहिरीवर मुलाला पोहायला शिकवत होते. सोनू हा अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे येथे इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. त्याला दिवाळीची सुट्टी असल्यानं त्यानं आपल्या वडिलांकडे पोहायला शिकायचा हट्ट केला. सुरुवातीला वडिलांनी पोहणं शिकवायला नकार दिला. मात्र मुलगा खूपच हट्टाला पेटला म्हणून त्याचे वडिल त्याला पोहायला शिकवण्यासाठी विहरीत उतरले होते.
बराच वेळ झाला तरी बापलेक दिसत नसल्याने कुटुंबातील लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र विहिरीतून कुठलाही आवाज आला नाही. त्यामुळं दोघेही पाण्यात बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी वर्तविला आहे. या विहिरीत जास्त पाणी असल्यान अद्याप दोघांची प्रेत अद्याप सापडले नाहीत. विहरीतील पाणी मोटारीच्या साह्याने काढण्याचे काम चालू आहे.