Hingoli : हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

0
492
Hingoli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली (रवींद्र पवार) | Hingoli : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे जुन्या वादातून दोन मुलांनी जन्मदेत्या वडिलांना मारहाण करुन खून केल्याची घटना शनिवारी ४ जून रोजी घडली आहे. याप्रकरणात पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलिस पोहोचल्याने खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणी दोन मुलांवर सोमवारी (दि..६) रोजी सेनगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संजय आबाराव देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील संजय आबाराव देशमुख व त्यांची दोन्ही मुले निखिल संजय देशमुख, गजानन संजय देशमुख यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होता.त्यातून छोट्या-मोठ्या कुरबुरी होत होत्या.म्हणून हा खून केला असावा असे पोलिसांनी सांगितले आहे. Hingoli

काठीने व लाकडाने मारहाण केली

दरम्यान शनिवारी (दि.४) रात्री साडेसात वाजता निखील देशमुख व गजानन देशमुख या दोघांनी त्यांचे वडील संजय देशमुख यांना काठीने व लाकडाने मारहाण केली.या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली.त्यानंतर रविवारी दोन्ही मुलांनी संजय देशमुख यांना उपचारासाठी रिसोड येथे दाखल केले.मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वाशिम येथे हलवले.त्याठिकाणीही प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी अकोला येथे नेण्यास सांगितले.मात्र दोन्ही मुलांनी त्यांना अकोला येथे न नेता रात्री पानकनेरगाव येथे आणले.मात्र रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. Hingoli

No leaves for UP Police personnel till May 4 in view of festivals - India  News

अंगावर केले गेले घाव

दरम्यान, खूनाची घटना लपवण्यासाठी दोन्ही मुलांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अंत्यविधीची तयारी केली.मात्र या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने रात्री पानकनेरगाव गाठले. पोलिसांनी मृत संजय देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. यामध्ये मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने तपासात स्पष्ट झाले. Hingoli

यावरुन शिवाजी आबाराव देशमुख यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी निखिल संजय देशमुख व गजानन संजय देशमुख या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक भोईटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

“आपण दोघे भाऊ- भाऊ मिळेल ते वाटून खाऊ” अशी कराड पालिकेत स्थिती : इम्रान मुल्ला

वाशिममध्ये विहिरीतून गाळ उपसताना आढळले शिवलिंग, शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात केली गर्दी

…म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे; रामदास आठवलेंचे मोठे विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here