मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडत आहे!! सोनिया दुहान यांच्या गौप्यस्फोटांमुळे खळबळ

Sonial Doohan And Supriya Sule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान (Sonia Doohan) यांनी पक्षाला रामराम ठेवला आहे. यामागे त्यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कारण असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. “सध्या पक्षात सर्व काही सुरळीत नाही. मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडत आहे” असे सोनिया दुहान यांनी म्हणले आहे. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर दुसऱ्या बाजूला सोनिया दुहान यांनी पक्ष सोडल्यामुळे शरद पवार गटाला याचा मोठा धक्का बसला आहे.

पक्ष सोडल्याच्या चर्चांना उत्तर देत सोनिया दुहान यांनी म्हटले आहे की, “मी शरद पवार यांना सोडलेले नाही आणि मी पक्ष सोडलेला नाही. या अफवा कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही. मी अजितदादांच्या पक्षात गेलेले नाही. शरद पवार यांच्याशी अनेक दशके जोडलेले नेते पक्ष का सोडत आहेत. याचा विचार सुप्रिया सुळेंनी करायला हवा. Aपक्षात सर्व काही सुरळीत चालत नाही… सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडावा लागत आहे.”

त्याचबरोबर, “आता नंतर राजकारण नंतर बघू, करिअर नंतर बघू, पक्षात राहावे, अशी परिस्थितीच सध्या नाही आहे. सेल्फी काढून पक्ष चालत नाही. पक्षाला पक्षाच्या नियमानुसार चालवावे लागते. ही गोष्टी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजुबाजुच्या नेत्यांना समजून घ्यावी लागले. मी पक्ष सोडत आहे, मी जाहीरपणे सांगतो की सुप्रिया सुळे यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. धिरज शर्मानेही सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडला” असा दावा सोनिया दुहान यांनी केला आहे.

दरम्यान, “सेल्फी काढून पक्ष चालत नाही. पक्षाला पक्षाच्या नियमानुसार चालवावे लागते. ही गोष्टी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजुबाजुच्या नेत्यांना समजून घ्यावी लागले. मी पक्ष सोडत आहे, मी जाहीरपणे सांगतो की सुप्रिया सुळे यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. धिरज शर्माने देखील सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडला” अशी टीका दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.