सोनिया गांधींची तब्ब्येत बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधींना सौम्य तापाची लक्षणे जाणवू लागली होती. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मार्चमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

सोनिया गांधी यांना याआधीही अशाच प्रकारच्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात सोनिया गांधीना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, एका दिवसानंतर जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या ठीक आहेत.

नव्या जोमाने सोनिया गांधी राजकारणात सक्रिय

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर ठेपल्या असताना सोनिया गांधी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकार विरोधात स्थापन करण्यात आलेल्या INDIA आघाडीच्या बैठकीत सुद्धा त्या उपस्थित राहत आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या विरोधी एकतेच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सुद्धा त्यानी काही वेळ सहभाग नोंदवला होता.