म्यूकरमायकोसिसला राष्ट्रीय महामारी घोषित करा; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी म्यूकरमायकोसिस या नव्या रोगाने शिरकाव केला आहे. अशावेळी बाजारात ब्लॅक फंगसच्या औषधांचा पुरेसा साठा नाहीये. त्यामुळे या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. तसेच ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात सोनिया गांधी यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.

या पत्रात सोनिया गांधींनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने ब्लॅक फंगस महामारी घोषित करावी. हा आजार झालेल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत. तसेच या आजाराचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, “मी समजू शकते की त्यांनी Liposomal Amphotericin-B म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक औषध आहे. बाजारात याचा तुटवडा आहे. हा आजार आयुष्मान भारत व बहुतांश आरोग्य विम्यांमध्ये समाविष्ट नाही. त्यांनी पुढे लिहिले की, म्युकरमायकोसिसग्रस्त अनेक रूग्णांना दिलासा मिळावा यासाठी, मी तुमच्याकडे याप्रकरणी तत्काळ मदत करण्याची आग्रहपूर्वक मागणी करत आहे. ”

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment