विशेष बातमी: सत्तास्थापनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात आहे. सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ निवास्थानी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा कि नाही याबाबत सोनिया यांच्या घरी खलबतं सुरु आहेत. अशा वेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेस आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आता संपर्क साधला आहे. दरम्यान उद्धव यांची सोनियांसोबत फोनवर चर्चा झाल्याने सोनिया आपल्या आमदारांचे मत विचारात घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या आमदारांशी संपर्क साधला असे यामागचे कारण समोर येत आहे.
काँग्रेसचे सर्व आमदार सध्या जयपूर येथे आहेत. तसेच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे असं मत असलेल्या ४४ आमदारांच्या सह्यांचा कागद सोनिया गांधी दिला आहे.भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा द्यावा असे या आमदारांचे म्हणणं आहे. तेव्हा सोनिया गांधी ह्या सेनेसोबत जाण्याचा निर्णय देण्याच्या द्विधा मनस्थिती आहेत. कदाचित शिवसेने सोबत न गेल्यास काँग्रेस आमदार फुटण्याची चिंता त्यांना लागून आहे. काँग्रेसकडून निवडून आलेल्या तरुण आमदारांचा गट हा सत्तेत जाण्यास उत्सुक आहे. तर शिवसेनेसोबत सत्तेत न जात शिवसेनेला बाहेरून पाठींबा द्यावा असं मत काँग्रेसच्या एका गटाचे म्हणणं आहे. याबाबत निर्णय घेण्याबाबत महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत.
काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगळ्या विचारसरणीचे आहेत. काँग्रेसची धर्मनिरपेक्ष तर शिवसेनेची हिंदुत्ववादी विचारप्रणाली असल्याने पाठिंबा द्यावा कि नाही हा प्रश्न सोनियांना पडला आहे असे समजते आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत गेल्यास त्याचा भविष्यात राजकीय फटका असेल अशी अडचण काँग्रेससमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, काँग्रेसच्या समर्थयाशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही.