भंडारकवठे खून प्रकरण; आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलांनी काढला काटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । दारू पिऊन आपल्या आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलांनीच कु-हाड आणि विळयाने गळा कापून आपल्या वडिलांचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पत्नी आणि दोन मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात गेल्या गुरूवारी एका व्यक्तीचा अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून मृतदेह पाण्यात टाकला होता. याची खबर मिळतात मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

घटना घडल्यापासून दत्तात्रयची पत्नी सुनिता, मुलगा आतिष आणि अल्पवयीन मुलगा फरार होते. त्यांचे मोबाईलही बंद होते.त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. मोबाईलचे लोकेशन सांगली भागत दाखवित असल्याने धांडे यांनी तपासासाठी चार पथके सांगोला तसेच सांगली जिल्हात,चडचण भागात पाठविले.रविवारी खब-यामार्फत वरील मारेकरी निवर्गी येथे येत असल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी चडचण पोलिसांच्या मदतीने पत्नी सुनिता चौगुले(वय ४५), मुलगा आतिष (वय २३) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. वरील आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी आपल्या गुन्हाची कबुली दिली.