जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह नागरिकांचा मृत्यू

0
47
sol
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात एकीकडे कोरोना महामारी पसरली असताना. आता देशाच्या सीमेवरून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते आहे जम्मू कश्मीरच्या सोपोर मध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दहशतवाद्यांनी सोपोर मध्ये अरमापोरा येथील नाक्याजवळ पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. यात चार जणांचा मृत्यू झाला त्यात दोन पोलिस आणि नागरिकांचा देखील समावेश आहे. दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच त्या हल्ल्यात इतर सहा जण देखील जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या नागरिकांचा मृत्यू

सोपोर येथील मंजूर अहमद शल्ला आणि बशीर अहमद या दोन नागरिकांचा मृत्यू झाला.  दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी हे दोघेही रस्त्यावर चालत होते त्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याची माहिती कश्मीरच्या आयजी विजयकुमार यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here