हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट मध्ये सर्वच काही आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रागाच्या भरात कोहलीला थेट नोटीस पाठवणार होते अशी माहिती समोर येत आहे.विराट कोहली ने पत्रकार परिषदेत केलेल्या काही विधानामुळे नाराज झालेल्या गांगुली ने विराट ला नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी, विराटला कर्णधारपद सोडू नको असं आम्ही सांगितलं होतं, असं एका मुलाखतीत म्हटलं.मात्र त्यानंतर विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्याशी बीसीसीआयकडून असा कुठलाही संवाद साधण्यात आला नाही. कर्णधारपद सोडू नकोस, असं कोणी म्हटलं नाही, अस म्हंटल.
त्यानंतर सौरव गांगुली यांनी संताप व्यक्त करत विराटला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला मात्र पण वाद आणखी वाढेल, म्हणून बीसीसीआयच्या सदस्यांनी सौरव गांगुलीला रोखलं. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर संघ रवाना होत असताना कर्णधाराला अशापद्धतीनं नोटिस जारी करणं योग्य ठरणार नाही असं मत बोर्डाच्या सदस्यांनी नोंदवलं होतं. बोर्डाच्या सदस्यांचं म्हणणं गांगुलीनंही ऐकलं आणि कोहलीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही.