ओळखा पाहू कोण…?; हि सध्याची नॅशनल क्रश असून बॉलिवूडमध्ये करतेय ग्रँड एन्ट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. हा टॅग तिला खुद्द गुगलनेच दिला आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्येसुद्धा पदार्पण करणार आहे. रश्मिका, स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहेत. आजकाल रश्मिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, कोरोना जाण्याची प्रतीक्षा करतेय. या आधीही तिने स्वतःच्या बालपणीचा एक डान्स करतानाच दुर्मिळ फोटो शेअर केला होता.

https://www.instagram.com/p/CPFhMniJoZe/?utm_source=ig_web_copy_link

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिकाने इंस्टाग्रामवर तिचा सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा फोटो शेअर केला होता. सोबत तिने मिशन मजनू चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केल्याचे देखील सांगितले होते.

https://www.instagram.com/p/CLetrw8pe13/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोत तिच्या आणि सिद्धार्थच्या हातात आपल्याला स्क्रीप्ट पहायला मिळतेय. तिने हा फोटो शेअर करताना लिहिले होते कि, अहहह.. माझ्या टीमला जॉइन करण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही. चला, तर मिशनला सुरूवात करूयात.

https://www.instagram.com/p/CLI6_Oep6Uf/?utm_source=ig_web_copy_link

‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ यासारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला, अमर बुटाला आणि गरिमा मेहता हे एकत्र येऊन पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन ‘मिशन मजनू’ हा चित्रपट तयार करणार आहेत. या चित्रपटात १९७० सालातील पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची एन रंजक कथा आहे. ज्यामूळे या दोन्ही देशांमधील संबंध कायमस्वरूपी बदलले.

https://www.instagram.com/p/CMB0XihA6xk/?utm_source=ig_web_copy_link

परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेल्या या जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना हि स्क्रीन शेअर करताना अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment