लॉकडाउनमध्ये कारने बाहेर फिरणं अभिनेत्रीला भोवलं; अपघातात जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंथा । करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण संयमाने घरात बसले आहेत. पण अजूनही काही बेजवाबदार महाभाग लॉकडाउन असूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. याला आता एक अभिनेत्री सुद्धा अपवाद राहिली नाही आहे. मात्र, लॉकडाउनमध्ये आपल्या कारने बाहेर फिरणं या अभिनेत्रीला चांगलच भोवलं आहे.

Sharmiela Mandre Sustains Injuries in Car Accident, Police ...

शर्मिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला मांड्रे लॉकडाउन असतानाही मित्र लोकेश वसंतसोबत बंगळूरुच्या रस्त्यावर फिरत होती. दरम्यान .शर्मिलाची गाडी वसंतनगर येथील अंडरब्रिजवर येताच तिने एका रेल्वेच्या पिलरला ठोकली. या दुर्घटनेमध्ये शर्मिला आणि तिच्या मित्राला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या दोघांवर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Actress Sharmila Mandre, the victim of a road accident, went out ...

पोलीस अधिकारी रविकांत गौडा यांनी या संदर्भात माहिती दिली. ‘सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील अभिनेत्री आणि तिचा मित्र घराबाहेर पडले कसे याचा शोध आम्ही घेत आहोत. ते दोघे ही फिरण्यासाठी बाहेर निघाले होते आणि हा गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

sharmila mandre accident: ನಟಿ ಶರ್ಮಿಳಾ ಕಾರು ...

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६६१ वर, तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

सावधान! आज दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापरू नका, नाही तर..

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

 

 

Leave a Comment