हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । South Indian Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता South Indian Bank ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे
20 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
South Indian Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवीन दर 20 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर आता बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सर्वसामान्यांना 2.65% ते 6.00% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.15% ते 6.50% पर्यंत व्याज दर ऑफर करत आहे. तसेच बँक आता एक वर्ष आणि एका दिवसाच्या FD वर सर्वसामान्यांना जास्तीत जास्त 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज देईल.
South Indian Bank च्या एफडीचे नवीन दर
South Indian Bank कडून आता 7 ते 30 दिवसांच्या FD वर 2.65%, 31 ते 90 दिवसांच्या FD वर 3.25%, 91 ते 99 दिवसांच्या FD वर 4.25% आणि 100 दिवसांच्या FD वर 5.50% व्याजदर देत आहे. त्याच प्रमाणे 101 ते 180 दिवसांच्या FD वर आता 4.25%,181 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.60%,1 वर्षाच्या FD वर 6.60%, 1 वर्ष आणि 1 दिवसाच्या FD वर 7.00% व्याजदर देईल.
त्याच प्रमाणे ही बँक आता 1 वर्ष 2 दिवस ते 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50%, 30 महिन्यांच्या FD वर 7.00%, 30 महिन्यांपेक्षा जास्त ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.50% आणि 5 वर्षे ते 10 वर्षे मुदतीच्याच्या FD वर 6% व्याजदर देईल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.southindianbank.com/interestrate/interestratelist.aspx
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये