गवंडी काम करणाऱ्या बापाचं विशालनं स्वप्न केलं साकार; कष्ट करत मिळवलं UPSC मध्ये यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती हालाखीची, दोनवेळच्या जेवणासाठी आई शिवणकाम करायची आणि वडील गवंडीकाम. दोघांनीही आपल्या लेकाला मोठं होऊन अधिकारी बनण्याची स्वप्न पाहिलेली. मग न खचता त्यांनी लेकाला पुढे शिकवलं. आणि लेकानंही आईवडिलांचं स्वप्न अधिकारी होऊन साकार केलं. हि गोष्ट एका चियत्रपटातील नाही तर खर्च असं घडलं आहे. होय, अहमदनगर येथील विशाल पवार या तरुणाने कष्ट करून देशातील सर्वात कठीण यूपीएससीची सीडीएस ही परिक्षा पास केली असून भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळवली आहे. पाहूया त्याची यशोगाथा…

Vishal Pawar

10 बाय 10 च्या खोलीत अभ्यास

विशालने प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून कठीण अशा यूपीएससी परिक्षेत यश मिळवले आहे. विशाल हा अहमदनगर जिल्ह्यातील बुरूडगाव येथे 10 बाय 10 च्या खोलीत वडील राजेंद्र, आई सुनिता आणि आपल्या आजीसह राहतो. त्याचे पहिले ते चौथीचे प्राथमिक शिक्षण हे बुरूडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर 10 वी पर्यंतचे शिक्षण हे अहमदनगरच्या रुपीबाई बोरा विद्यालयात झाले.

Vishal Pawar

अशी केली UPSC ची तयारी

दहावीनंतर विशालने अहमदनगरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. घरची परिस्थिती साधारण असल्याने क्लासेस लावणे शक्य नव्हते. त्यामुळे विशालने एक वर्ष खासगी कंपनीत नोकरी केली. त्यातून पैसे जमा करून पुण्याच्या काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली.

UPSC Vishal Pawar

पहिल्या प्रयत्नात त्याला अपशय

विशालने पहिल्या प्रयत्नात परीक्षा दिली मात्र, त्याला अपशय आलं. अपयशाने मात्र, तो खचून गेला नाही तर त्याने 10 एप्रिलला पुन्हा सीडीएसची परीक्षा दिली. यामध्ये त्याला यश मिळालं. सप्टेंबर महिन्यात बंगळुरू येथे त्याची मुलाखत झाली. त्यातही विशालने यश मिळवलं. यानंतर मेडीकल आणि इतर सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मागील आठवड्यात निकाल प्रसिद्ध झाला.

vishal 04

भारतीय सैन्यदलात देशात टॉप 100 मध्ये 61 वा क्रमांक

विशालने भारतीय सैन्यदलाच्या दिलेल्या परीक्षेत यश मिळवले. भारतीय सैन्यदलासाठी त्याचा देशात टॉप 100 मध्ये 61 वा नंबर आला असून नेव्हीसाठी टॉप शंभर मध्ये 20 वा नंबर आला आहे. अगदी लहानपणापासूनच आर्मीत जाण्याचे विशालचे स्वप्न होते. ते स्वप्न आता त्याचे पूर्ण झाले आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतही त्याने न डगमगता प्रामाणिकपणे काम केले. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.