नवी दिल्ली । 2016 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड (SGBs) ने गुंतवणूकदारांना 85% रिटर्न दिला आहे. जानेवारी 2016 मध्ये जारी केलेल्या या बॉड्सची रिडेंप्शन प्राइस आता 4,813 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याची इश्यू प्राईस 2,600 रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति युनिट सुमारे 85 टक्के नफा देण्यात आला आहे.
एका प्रसिद्धीपत्रकात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, 8 फेब्रुवारी 2022 रोजी देय असलेल्या प्री-मॅच्युअर सॉव्हरेन गोल्ड बाँडची रिडेंप्शन प्राइस 31 जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या साध्या सरासरीच्या आधारे निर्धारित केली जाईल. SGBs सरकारी सिक्युरिटीज आहेत, ज्यांचे मूल्य सोन्याच्या संदर्भात आहे. हे खरे तर सोन्याला पर्याय आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मदतीने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड पहिल्यांदा जारी करण्यात आले.
8 वर्षात मॅच्युर होते
सॉव्हरेन गोल्ड बॉण्डचा कालावधी आठ वर्षांचा असतो. यामध्ये, पुढील व्याज भरण्याच्या तारखेला पाच वर्षांनी ते रिडीम केले जाऊ शकते. प्री-मॅच्युअर रिडेम्पशनची सुविधा दर सहा महिन्यांनी उपलब्ध आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूकदाराला किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करावी लागते. कोणतीही व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब जास्तीत जास्त चार किलोपर्यंतचे गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकतात. तर, ट्रस्ट आणि तत्सम घटकांसाठी जास्तीत जास्त खरेदी मर्यादा 20 किलो आहे.