धक्कादायक ! त्याने आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून मांस शिजवून खाल्ले

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्पेन : वृत्तसंस्था – स्पेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपीने आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केली आहे. तो फक्त हत्या करून थांबला नाही त्यानंतर त्याने मृतदेहाचे बारीक बारीक तुकडे करून खाल्ले आहेत. या घटनेमुळे सगळेच लोक हादरून गेले आहेत. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला कमीत कमी वर्षांची शिक्षा होऊ शकते.

हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपी एल्बर्टो सांचेज गोमेज हा एक बेरोजगार असून मेड्रिड येथे राहतो. मारिया गोमेज यांच्या मित्राने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस सांचेज याच्या घरी गेले. तेव्हा पोलिसांना सांचेज याच्या ६८ वर्षीय आई मारिया गोमेजच्या शरीराचे काही तुकडे फ्रिजमध्ये आढळले होते. तर काही तुकडे एका प्लास्टिक बॅगमध्ये सापडले होते.

मारिया गोमेज यांच्या मित्राने मारिया गोमेज या काही दिवसांपासून गायब असल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलीस जेव्हा मारिया गोमेज यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घराची तपासणी केली असता पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर पोलिसांनी सांचेज याची कसून चौकशी केली त्यानंतर सांचेजने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

जेव्हा पोलीस मारिया गोमेज यांच्या घरी गेले तेव्हा त्यांचा मुलगा सांचेज याने दरवाजा उघडला. तेव्हा त्याने सांगितले कि मारिया गोमेज येथेच आहे मात्र, ती आता मृत आहे. मी आणि माझ्या कुत्र्याने मिळून तिचे तुकडे खाल्ले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली तेव्हा त्यांना फ्रिजमध्ये आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत मारिया गोमेज यांच्या शरीराचे तुकडे सापडले. हि माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.