Business Idea : सध्या डिसेंबर महिना सुरु असून काही दिवसातच नववर्षाचे आगमन होणार आहे. अशा वेळी जर तुम्ही नवीन वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त व्यवसाय आणला आहे जो तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये सुरु करू शकता.
हा व्यवसाय तुम्ही ख्रिसमस-नवीन वर्षाच्या निमित्ताने सुरू करू शकता.हा खास महिलांसाठी असणारा व्यवसाय आहे. जर महिलांना मोकळा वेळ असेल तर वेळेचा सदुपयोग होईल आणि त्यांना चांगले पैसेही मिळतील. आम्ही तुम्हला गिफ्ट बास्केट बनवण्याच्या व्यवसायबद्दल सांगत आहे. जर तुम्हाला सजावटीचे काम आवडत असेल तर तुम्ही या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवू शकता.
वास्तविक, आज लोकांना विशेष प्रसंगी गिफ्ट बास्केट खरेदी करायला आवडते. सर्वसाधारणपणे लोक यात फारसे सौदेबाजी करत नाहीत. बाजारात गिफ्ट बास्केटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढदिवस, वर्धापनदिन आणि इतर शुभ प्रसंगी गिफ्ट बास्केटची मागणी प्रामुख्याने शहरी भागात वाढत आहे.
गिफ्ट बास्केट व्यवसाय म्हणजे काय ते जाणून घ्या
गिफ्ट बास्केट व्यवसायात विविध प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी टोपली बनवली जाते. ज्यामध्ये गिफ्ट चांगले पॅक करून दिले जाते. ही टोपली तुम्ही घरी बनवू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या किमतीत गिफ्ट बास्केट तयार करू शकता. आजकाल अनेक कंपन्यांनी गिफ्ट बास्केट बनवायला सुरुवात केली आहे. गिफ्ट बास्केट व्यवसाय तुम्ही खूप कमी गुंतवणूकीमध्ये सुरु करू शकता. तुम्ही 5000 ते 8000 रुपयांपासून हा व्यवसाय सुरु करू शकता.
या वस्तू गिफ्ट बास्केटसाठी आवश्यक आहेत
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गिफ्ट बास्केट किंवा बॉक्स रिबन लागेल. रॅपिंग पेपर, लोकल आर्ट एंड क्राफ्ट, सजावटीचे साहित्य, दागिन्यांचे तुकडे, पॅकेजिंग साहित्य, स्टिकर्स, फॅब्रिकचे तुकडे, पातळ वायर, कात्री, वायर कटर, मार्कर पेन, पेपर श्रेडर, कार्टन स्टेपलर, गोंद आणि कलरिंग टेप यासारख्या वस्तूची तुम्हाला आवश्यकता आहेत.
मार्केटिंग कसे करायचे?
गिफ्ट बास्केट व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी, तुम्हाला भेटवस्तूचा एक फॉरमॅट तयार करावा लागेल आणि तो फॉरमॅट म्हणून तुमच्या जवळच्या बाजारपेठेतील मोठ्या दुकानदारांना दाखवावा लागेल. तसेच तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील गिफ्ट बास्केट ऑनलाइन विकू शकता. तुम्ही तुमच्या गिफ्ट बास्केटची किंमत थोडी कमी ठेवल्यास ती सहज विकली जाईल. या व्यवसायासाठी तुम्हाला कोणतेही घर किंवा दुकान भाड्याने देण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरातूनच व्यवसाय सुरू करू शकता.