गुलाबी थंडीत प्रेमी जोडप्यांसाठी चहावाल्याची अनोखी ऑफर; इथं गरमा गरम चहासोबत मिळतय बरंच काही…

0
168
Tea loving couples
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियामध्ये अनेक गोष्टी वेगाने व्हायरल होत असतात. अशाच एक चहावाला त्यांने ठेवलेल्या अनोख्या ऑफरमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. हा चहावाला व्हायरल होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याने दोन ठेवलेल्या खास ऑफर होय. प्रेमात पडलेलया प्रेमी युगुलांना 15 रुपयांत तर बेवफाना 10 रुपयांत चहा दिला जातोय. त्याच्या अनोख्या ऑफरमुळे दररोज लोक गर्दी करत आहेत.

प्रेमिकांसाठी ठेवलेल्या अनोख्या ऑफरमुळे मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील एक चहावाला चर्चेत आला आहे. सिंगरौली जिल्ह्यातील राजमिलन येथील रहिवासी दिनेश शहा यांचे चहाचं दुकान आहे. या दुकानात चहाची नावं वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने ठेवण्यात आले आहे. त्याच्या पण टपरीचे नाव इतके हटके आहेत की काही दिवसांतच या दुकानात रोज 2 हजार ते 5 हजारांपर्यंत चहाची विक्री सुरू झाली. दिनेश शहा यांचं दुकान राजमिलन गावात आहे. टपरीच्या नावाने हे चहाचे दुकान आहे. या चहाच्या दुकानात चहाच्या दरातही सवलत आहे, पण ती फक्त प्रेमात धोका मिळालेल्यांसाठीच होय.

त्यांच्यासाठी खास 10 रुपयांत चहा मिळतो. त्याचबरोबर प्रेमी युगुलांना 15 रुपयांत चहा मिळतो. याशिवाय सर्वसामान्यांसाठीही स्वतंत्र दर निश्चित करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या इतर लोकांसाठी 20 रुपयात चहा, प्रेमी युगुलांसाठी 15 रुपयात चहा आणि प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी 10 रुपयात चहा आहे. चहावाल्याची ही अनोखी स्टाईल सर्वांनाच पसंत पडली आहे. लोकही चहा पिण्यासाठी इथे लांबून लांबून येत आहेत. संध्याकाळी दुकानात बरीच गर्दी जमा होत आहे. संध्याकाळ होताच या दुकानात प्रियकर-प्रेयसी आणि विवाहित जोडपी चहाचा आस्वाद घेण्यासाठी येतात.