हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. थंडी आता निरोप घेण्याच्या मार्गावर असली तरी अनेक राज्यांमध्ये अद्याप थंडी आहे. दिवसा उन्हामुळे आणि संध्याकाळी थंडीपासून नागरिकांना आता हळूहळू दिलासा मिळत आहे. अशा वातावरणात तुम्हीही जर व्हेलेंटाईन वीकमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दक्षिण भारतातील TOP 8 अशी ठिकाणे आहेत. कि जेथे गेल्यावर तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. पाहूया ती ठिकाणी…
जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा पर्यटनासाठी तसा खास महिना मानला जातो. कारण या महिन्यातील गुलाबी थंडीचे वातावरण अनेकांना फिरण्यासाठी परफेक्ट वाटते. त्यामुळे कित्येकजण या महिन्यात पर्यटनाचा प्लॅन करतात. तुम्हीही हिरवाईचा आनंद घेण्यासाठी केरळमधील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. केरळला भेट देत असताना तुम्ही अनेक ग्रामीण बाज असणाऱ्या काही गावांना आणि शहरांना भेट देऊ शकता.
1) अलप्पुझा (Alappuzha)
अलप्पुझा हे केरळमधील अत्यंत सुंदर अशा ठिकाणांपैकी एक आहे. पूर्वेचे व्हेनिसे म्हणून अलप्पुझा शहराला ओळखले जाते. नौका शर्यत, बॅकवॉटर समुद्रकिनारे, सागरी उत्पादने आणि खाद्यपदार्थ यांसाठी ही शहरे प्रसिद्ध आहेत. पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलप्पुझाने केरळच्या सागरी इतिहासात नेहमीच महत्वाचे स्थान भूषविले आहे. अलप्पुझा समुद्र किनारा हे एक लोकप्रिय सहलीचे ठिकाण आहे. येथील समुद्रात गेलेला खांब 137 पेक्षा अधिक वर्ष जुना आहे. विजया बीच पार्कमधील मनोरंजनाच्या सुविधा समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणात भर घालतात. या ठिकाणी जवळच एक जुने लाईटहाऊसही आहे जे पर्यटकांना आकर्षित करते. हाऊस बोट क्रूझ एक मस्त पर्याय आहे. अल्लप्पुझाच्या बॅकवॉटरमध्ये तुम्हाला हाऊस बोट पहायला मिळतात त्या खरंतर जुन्या काळातल्या केट्टुवल्लमचे सुधारित रुप आहे.
2) मुन्नार (Munnar)
मुन्नार हे केरळचे प्रसिद्ध असे एक ठिकाण होय. तीन पर्वत रांगा- मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल ह्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 मी आहे. मुन्नारचे हिल स्टेशन कधीकाळी दक्षिण भारताच्या पूर्वकालीन ब्रिटिश प्रशासनाचे उन्हाळी रिसॉर्ट होते. या हिल स्टेशनची ओळख आहे येथील विस्तिर्ण भू भागात पसरलेली चहाची शेती, वसाहती बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान. ट्रेकिंग आणि माउंटेन बाइकिंगसाठीही हे एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. मुन्नार (केरळ) ब्रिटिशांनी विकसित केलेल्या हिल स्टेशनसारखेच मुन्नारही एक थंड हवेचे ठिकाण आहे. केरळच्या इडुवकी जिल्ह्यात मुन्नार आहे. तीन पर्वतरांगा-मुथिरपुझा, नलयन्नी आणि कुंडल यांच्या संगमावर हे वसलेले आहे. विस्तीर्ण भूभागात पसरलेली चहाची शेती, वसाहती, बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान यामुळे पर्यटक इकडे आकर्षित होतात.
3) इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान (Irvikulam National Park)
मुन्नार आणि त्याजवळील भागातील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान होय. हे उद्यान मुन्नारपासून साधारण 15 किमी अंतरावर असून लुप्त होत चाललेला प्राणी “नीलगिरी टार” साठी हे ओळखले जाते. 97 चौरस किमी अंतरापर्यंत पसरलेले हे उद्यान दुर्मिळ जातीची फुलपाखरे, वन्यजीव आणि पक्षांच्या अनेक दुर्लभ जातींचे आश्रयास्थान आहे. हे स्थान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे. उद्यानातील चहाचे विस्तृत मळे आणि त्याचबरोबर पर्वतरांगावर वेढलेली धुक्याची दाट चादर यांचे एक मनमोहक दृष्य येथे पहावयास मिळते. नीलकुरिंजीच्या फुले फुलल्यानंतर जेव्हा पर्वताची उतरण जणु काही नीळ्या रंगाच्या चादरीने झाकली जाते. हे एक उत्तम असे पर्यटनाचे ठिकाण आहे.
4) कोची (Kochi)
केरळमधील कोची हे शहर कोचीन नावाने देखील ओळखले जाते. कोचीमध्ये तुम्हाला भरपूर शॉपिंग करता येईल. कोचीन केरळमधील फारच प्रसिद्ध बंदर आहे. येथे पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यामुळे तिथे आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात चालते. तुम्हाला या ठिकाणी उत्तम ड्रेस मटेरिअल्स, सोनं आणि इतर दागिन्यांचे प्रकार मिळतील. त्यामुळे केरळला आल्यानंतर कोची अगदी मस्त आहे. तुम्हाला या ठिकाणी पोर्तुगीजांच्या अस्तित्वाच्या अनेक गोष्टी पाहाचयला मिळतील. याशिवाय कोची किल्ला, मत्तान चेरी पॅलेस, चेराई बीच आणि बरीच काही ठिकाणे आहेत.
5) कोवलम (Kovalam)
केरळमधील कोवलम हे ठिकाण वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अगदी हमखास वॉटर स्पोर्टससाठी जाता येते. समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कोवलमला जायलाच हवं. कोवलमचे बीच फारच सुंदर आहेत. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल तर तुम्हाला या ठिकाणी अगदी आवर्जुन जायला हवं. तुम्हाला जरी अँडव्हेंचर करायचं नसेल तरी सुद्धा येथील निसर्ग सौंदर्य पाहायला तुम्ही जायला हवं. याशिवाय येथे फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.
6) कन्याकुमारी (Kanyakumari)
केरळला गेल्यानंतर तामिळनाडूतील कन्याकुमारी हे प्रसिद्ध असे ठिकाण समुद्र किनारी आहे. या ठिकाणी भव्य असे विवेकानंद स्वामींचे स्मारक आहे आणि कन्याकुमारीचे मंदिर आहे. शिवाय येथे सूर्याेदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही गर्दी असते. या ठिकाणी तुम्हाला सुंदर मोत्याचे दागिने मिळतील. हिंदी महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्र यांचा सुरेख संगम या ठिकाणी होत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे तीन वेगळे रंग दिसतात. तामिळनाडूत आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बस करुन येऊ शकता.
7) एर्नाकुलम (Ernakulam)
केरळला फिरण्यासाठी आल्यानंतर एर्नाकुलम हे एक उत्तम असे पर्यटन स्थळ आहे. एर्नाकुलमबद्दल सांगायचे झाले तर ते एखाद्या शहराप्रमाणे आहे. एर्नाकुलम ही केरळची आर्थिक राजधानी असल्यामुळे हे ठिकाण तुम्हाला मुंबई, दिल्ली सारख्या शहरांसारखी जाणवेल. त्यामुळे केरळचे खास कपडे, खाद्यपदार्थ अशा गोष्टी हमखास या ठिकाणी मिळू शकतील. याठिकाणी काही ब्रीज आणि पार्क्स पाहण्यासारखे आहे. तसेच केरळी जेवणाचा आस्वाद उत्तम प्रकारे या ठिकाणी घेऊ शकता.
8) कोझीकोडे (Kozhikode)
केरळमधील कोझीकोडे ही जागा कालिकत या नावाने आधी प्रसिद्ध होते. साधारण 500 वर्षांपूर्वी येथून कापड, मसाले आणि अन्य गोष्टींचे निर्यात ज्यू आणि अरब लोकांना केले जात होते. या शिवाय कोझाकोडे येथील मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. त्यांची रचनाही तुम्हाला फार वेगळी जाणवेल. त्यामुळे केरळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी फारच महत्वाचे आहे. या ठिकाणी कोझीकोड बीच, मनानाचिरा,कदालुंदी बर्ड सेंच्युरी,आर्किओलाॅजी म्युझिअम अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.