दिवाळीच्या सणानिमित्त पुणेकरांसाठी गुड न्यूज; धावणार ‘ही’ विशेष साप्ताहिक ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी दिवाळीच्या सणामुळे अनेक प्रवासी आपल्या मायगावी जात असतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळते. गर्दीमुळे अनेक गैरसोयी निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी पुण्याहून विशेष गाडी चालणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. हि गाडी पुणे जोधपूर साप्ताहिक विशेष म्हणून ओळखली जाईल. या निर्णयामुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे. या आनंदाच्या बातमीमुळे अनेक लोकांचा प्रवास सुखद होणार आहे.

पुणे जोधपूर विशेष गाडी

रेल्वे प्रशासनाने पुणे जोधपूर दरम्यान आठवड्याला विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होईल . पुणे ते जोधपूर गाडी क्रमांक 04808 , रेल्वे 27 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी म्हणजे शनिवारी रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी जोधपूरला पोहचणार आहे. नंतर जोधपूर ते पुणे साप्ताहिक विशेष रेल्वे 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी जोधपूरहून दुपारी 4:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11:10 वाजता पुण्यात पोहोचेल. या रेलवेचा क्रमांक 04807 हा असेल.

रेल्वे थांबण्याची स्थानके

हि गाडी विशेष स्थानकावर थांबणार आहे. त्यामध्ये लोणावळा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, दुर्गापूर, जयपूर, फुलेरा, नवा शहर, कुचमन शहर, मकराना, डेगाणा आणि मेटरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रवास करताना अडचणी येणार नाहीत .रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सणाच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास मिळेल आणि प्रवासातील गर्दी कमी होईल.