एका दृष्टीहीन व्यक्तीने कमल हासन यांच्या विक्रम चित्रपटामधील गाणे बादलीवर वाजवले

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटानंतर आता अभिनेता कमल हासन (kamal haasan) यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाची क्रेझ लोकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. विक्रम या चित्रपटामधील ‘पथाला-पथाला’ हे गाणं सर्वांच्याच पसंतीचं ठरत असून अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सारेच जण या गाण्यावर वेगवेगळे व्हिडीओ तयार करत आहेत. त्यामध्येच आता एका दृष्टीहीन व्यक्तीनं चक्क बादली वाजवत हे गाणं गायलं आहे. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कमल हासनचा (kamal haasan) ‘विक्रम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा आधीच एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ठरलाय आणि प्रेक्षक तसेच समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. या चित्रपटातलं ‘पथाला पथाला’ हे गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. या दृष्टीहीन व्यक्तीने चक्क बादली वाजवत हे गाणं गायलं आहे. तो अतिशय उत्तम पद्धतीने बीट्सवर बादली वाजवताना दिसत आहे.

हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक या दृष्टीहीन व्यक्तींच्या आवाजाचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला 41 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केले आहे. तसेच अनेक लोकांनी या व्हिडिओवर कमेंटदेखील केल्या आहेत.

हे पण वाचा :
बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा

शिवसेनेच्या आमदारांना गुजरात मध्ये मारहाण; संजय राऊतांचा आरोप

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिलाय, त्यामुळे ठाकरेंनी आता…; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया