हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई शहर व उपनगर परिसरात ट्रॅफिकची समस्या नवी नाही. यातच आता नव्याने बांधलेले रस्ते आधुनिक गाड्या व तरुणाई मध्ये असलेली वेगाने वाहने चालवण्याची इर्षा यामुळे अनेकदा ट्रॅफिक असलेल्या ठिकाणी अपघात होतात. व अपघातग्रस्ताना लवकर मदत मिळणे अशक्य होते. तसेच वाहतूक सुरळीत पद्धतीने मार्गक्रमण करू शकत नाही व लोकांना अनेकदा त्रास होतो. त्यामुळे मुंबई मधील वाहतूनिकीचे संचालन करणाऱ्या मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी नवीन मुंबई मधील रस्त्यांवर गाडी चालवण्यासाठी वाहनांच्या वेगासंदर्भात नियमावली जारी केली आहे.
मुंबई मधील वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने वेगाला मर्यादा :
मुंबई मधील वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने 13 डिसेंबर 2023 पासून मुंबई शहरात नमूद मार्गावर वाहने चालविण्यावर वेग मर्यादा निर्बंध घालण्यात आल्या आहेत. यानुसार पी- डीमेलो रोड, शहिद भगतसिंग रोडवर ताशी 50 किलोमीटर (km/hr ) वेग मर्यादा घोषित केली आहे. तर गोदरेज जंक्शन ते ऑपेरा हाऊस, महर्षी कर्वे,हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, केशवराव खाडे मार्ग रोडवरही 50 किमी प्रतितास (km/hr ) ही मर्यादा लागू असेल.
चढ व उतार 40 कि.मी. प्रति तास असेल वाहनांचा वेग :
डायमंड जंक्शन ते एम. टी. एन. एल. जंक्शन, एव्हॅन्यु – १, बी. के. सी. बिंदू माधव चौक ते डॉ. केशव बलराम हेडगेवार चौक (लव ग्रोव्ह) जंक्शन, खान अब्दुल गफारखान रोड, वीर जिजामाता भोसले उड्डाणपुल, चेंबुर या ठिकाणी 60 किमी प्रतितास ( km/hr ) ही मर्यादा लागू असेल.छेडा नगर येथील नवीन उड्डाणपुल (दक्षिणोत्तर) येथे 40 किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. चढ व उतार 40 कि.मी. प्रति तास असेल.
पूर्व/पश्चिम वाहिनीवर वेगमर्यादा 70 कि.मी. प्रती तास राहील :
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर 70 किमी प्रतितास ही मर्यादा लागू असेल. यासह जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) उड्डाणपुलावर चढण, उतरण व वळणावर वेग मर्यादा 30 कि.मी. प्रती तास आणि उड्डाणपुलावरील पूर्व/पश्चिम वाहिनीवर वेगमर्यादा 70 कि.मी. प्रती तास राहील. अमर महल फ्लायओव्हरवर येथील वेग मर्यादा 70 किमी प्रतितास असेल. चढ व उतारावर 40 किमी प्रतितास मर्यादा असेल.