पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील हडपसर भागात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिल्यामुळे या अपघात (accident) झाला आहे. एका स्कूटीला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कंटेनर थेट रिक्षावरच उलटला. यावेळी रिक्षाचालक कंटेनरखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान हा दुर्दैवी अपघात (accident) घडला. या अपघातामुळे पुणे-सोलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात रिक्षा चालक ठार झाला तर रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण धडकेत रिक्षाचा पार चेंदामेंदा झाला आहे.
अशा प्रकारे घडला अपघात ?
सिमेंटचा मिक्सर जात असताना वाटेत अचानक आलेल्या स्कूटीला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने प्रयत्न केला. पण हा प्रयत्न करताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर एका बाजूला कलंडला (accident) गेला. यानंतर हा कंटेनर दुर्दैवाने एका रिक्षावर उलटला. यात रिक्षाच्या चालकासह एकूण 3 जण जखमी झालेत. पुणे सोलापूर रोडवर असलेल्या रवी दर्शन येथील बसस्टॉप समोर हा भीषण अपघात घडला. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे (accident) रस्ते अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर