कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाकटडून अनेक निर्बंध घातले जात आहेत. तसेच वीकेंड लाॅकडाऊनमुळे घरातून बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. अशावेळी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशावेळी सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे मात्र आपल्या शेतातील कामात व्यस्त आहेत. आपल्या शेतात हातात विळा घेवून ८१ वर्षाचा हा तरूण खासदारांचा व्हिडिअो सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड येथे असलेल्या निवासस्थाना जवळील शेतातील गहू पिक काढण्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील हे व्यस्त असल्याचा व्हिडिअो सध्या व्हायरल होत आहे. खासदार नेहमीच आपल्या राजकीय, सामाजिक व धार्मिक कामात व्यस्त असल्याचे नेहमीच पहायला मिळत असते. मात्र वीकेंड लाॅकडाऊनमुळे कार्यालयातील लोकांची गर्दी कमी झाल्याने निवांत बसण्यापेक्षा खासदार पाटील हे शेतातील कामात व्यस्त आहेत.
खासदार श्रीनिवास पाटील हे ८१ वर्षाचे असून ते नेहमीच आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. या वयातही ते शेतात करत असलेल्या कामामुळे अनेकांचा उत्साह वाढवणारा आहे. तसेच यावेळी स्वतः च्या शेतात काम करण्यात आनंद असल्याचे ते म्हणाले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group