ब्रेक द चेन म्हणणाऱ्यांनो चेक यूवर ब्रेन ः तृप्ती देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | महाराष्ट्रात कोरोना राैद्ररूप धारण करत आहे. रेमडिसिविर इंजेक्शन ५० वेळा फोन करून मिळत नाही. इंजेक्शनचे काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना का पकडले जात नाही. राज्य सरकार म्हणते ब्रेक द चेन मला त्यांना सांगायचे आहे चेक यूवर ब्रेन असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.

राज्यात सध्या कोरोना बाधितांना रेमडिसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने व्हिडिओव्दारे तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या, आपल्या राज्यात ३० मिनिटांत पिझ्झा ऑर्डर केला जातो. पिझ्झाची ऑर्डर ३० मिनिटांत मिळाली नाही, तर ती ऑर्डर रद्द केली जाते किंवा पैसे परत मिळते. त्याच राज्यात रेमडिसिविरची इंजेक्शन भीक म्हणून लोकांना मागावी लागत आहेत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/794021834856937

राज्य सरकार नेमकं काय करते. लाॅकडाऊनमध्ये वीज कापली जाते. मरणाच्या दारात त्यांना व्हेटिलेटर, ऑक्सिजन, बेड मिळत नाही, मग राज्य सरकार काय करते. जनतेने मग जगायचं कसं? राज्य सरकारला आम्ही सर्व जनता पूर्णपणे सहकार्य करत आहोत. परंतु राज्य सरकार जनतेसाठी आता कमी पडतय असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.

Leave a Comment