हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखा नालायक माणूस दुसरा कोणी नाही असं म्हणत त्यांचे सक्खे भाऊ श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ मैदानात उतरलं आहे. यावेळी काटेवाडी येथील गावकऱ्यांशी संवाद साधताना श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची जोरदार धुलाई केली. तसेच आत्तापर्यंत तुम्हाला जी काही पदे मिळाली ती फक्त शरद पवार साहेबांमुळेच मिळाली असेही त्यांनी ठकाणवुन सांगितलं.
श्रीनिवास पवार म्हणाले, आजपर्यंत मी नेहमी अजित पवारांसोबत राहिलो, चांगला काळ असो किंवा वाईट काळ असो, मी नेहमीच त्यांना साथ दिली. पण जेव्हा आमची चर्चा झाली. तेव्हा आमदारकीला तू आहे. खासदारकीला साहेबांना राहू दे, असे स्पष्ट आपण अजित पवार यांना सांगितले होते. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. सध्या त्यांचे वय ८३ वर्ष आहे. अशा काळात साहेबांना सोडणं माझ्या मनाला पटलेलं नाही. अजित पवारांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही. का तर पुढची १० वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्यामुळे अजित पवार सारखा नालायक माणूस नाही असं म्हणत श्रीनिवास पवार यांनी सडकून टीका केली.
जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्याला घराच्या बाहेर काढायचं नसत. जे काही पदे मिळाली ती फक्त शरद पवार साहेबांमुळे मिळाली. त्याच साहेबांना आपण म्हणतो, आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा. हे माझ्या मनाला पटत नाही. आपण औषध विकत घेताना एक्सपायरी डेट असते, नात्यांमध्ये पण एक्सपायरी डेट असते. पण जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं. अजित पवारांना शरद पवार साहेबानी ४ वेळा उपमुख्यमंत्री केलं, २५ वर्ष मंत्री केलं तरी ते म्हणत आहेत कि काकांनी माझ्यासाठी काय केले?
हि सर्व भाजप आणि आरएसएसची चाल आहे, कारण त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हे नाव महाराष्ट्रच्या राजकारणातून संपवायचं होत. त्यांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळालं नाही. घरातले व्यक्ती जर बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो हे भाजपला माहित आहे. . घरातला माणूस घरच्याला माहीत नाही. साहेबांना एकुलती एक मुलगी आहे त्यांना या वयात काय वाटलं असेल. साहेब जर दहा वर्ष जुने असते तर कळलं असतं, साहेबांनी काय केलं असतं. वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका. त्यांनी तुमच्यावर राज्य सोपवले होते. ते दिल्ली पाहत होते. परंतु तुम्ही वेगळेच काही केले, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले.