कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मी उद्धवजीशी बोलू का? तुम्हांला काय मदत लागेल? संरक्षण मंत्र्याची मान्यता लागेल का? राजनाथ सिंगना केंद्रातून सूचना द्यायला लावू का? दौलत माझ्याकडे बहुजनांची पोर आलीत त्यांची वयाची मर्यादा संपली की, त्यांचा स्वप्नांवर पाणी फिरणार आहे. काही करा पण ही भरती झालीच पाहीजे, गेल्या वर्षीची भरती कोरोनामुळे रद्द झालीये. यंदा या पोरांचा खोळंबा नको अशी मागणी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे. आर्मी भरतीची तयारी करणारी मुले भरती पुढे ढकलली जाऊ नये या मागणीसाठी खासदार पाटील यांच्याकडे गेली असता पाटील यांनी तात्काळ याची दखल घेत फोनाफोनी करुन चक्र फिरवली.
कोरोनामुळे आर्मिचा रखडलेल्या भरतीची हतबलता तरूणांच्यात दिसून येत आहे. आर्मिचा प्रश्न म्हणजे बराच अभ्यासपूर्ण मांडणारा माणूस लागणार, त्यामुळे हा प्रश्न नक्की कुणाकडे आणि कुठे मांडावा कळतं नाही. अशावेळी तरूणांना एकच माणूस योग्य वाटला म्हणजे साताराचे खासदार श्रीनिवास पाटील हे होय. त्यांनीही तरूणांचा विश्वास ढळू न देता चक्क एका तासांत फोनाफोनी करुन तरूणांना दिलासा दिला आहे.
तरूणांनी ठरल्याप्रमाणे श्रीनिवास पाटील यांची वेळ माघून घेतली. तेथे सारंग पाटील यांनी थोडी-फार माहिती करून पुढे जवळ-जवळ सव्वा तास खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. या काळात मुलांच्या आयुष्याशी प्रश्न असल्याने प्रतिक्षेत असणाऱ्या कुठल्याच पुढऱ्याला किंवा व्हीआयपींना आत येण्यास मनाई केली होती. तरूणाचं ऐकून घेतल्यावर पहिला फोन लावला कोल्हापूरचे कलेक्टर दौलत देसाई यांना. प्रशासकीय अधीकाऱ्यांशी बोलायचं कसब, हे त्या प्रशासन कोळून पिल्याला माणसाला माहीत नसेल तरच नवल.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, मी उद्या तुमच्याकडे कुणाल बाबर या युवकाला पाठवत आहे. भरती संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना बनवा. पुढे लगेच सारंग पाटील यांना भारतीय संरक्षण मत्र्यांना पत्र लिहा आशा सूचना केल्या. लगेच दुसरा फोन सातारा कलेक्टर शेखर सिंग यांना केला. आपल्या मतदारसंघात प्रशासनावर किती कमांड आहे, या माणसाची हे नकळत लक्षात येत होत. खासदार जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, आपण साताऱ्यातून भरतीला जाणाऱ्या प्रत्येक पोराला मोफत लस देवूया का? पण त्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे कलेक्टरने अपरिहर्ता दर्शविल्याने, मग लस टोचू शकत नसाल तर सगळ्या पोरांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी जिल्हा शासकीय रुग्णालयाला मोफत करण्याचे आदेश त्यानी पुढे दिले. त्यानंतर सुद्धा जिल्हा रुग्णालयात तिसरा फोन जिल्हाशल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांना केला. सातारा जिल्ह्यातून आर्मी भरतीला जाणाऱ्या प्रत्येक तरुणांची कोरोना चाचणी मोफत करून द्यायची आहे, तशी प्रेस नोट काढावी. त्याचबरोबर तरूणांच्यासोबत एक फोटो घेत स्वतःचा वैयक्तिक नंबर देत भरती होईपर्यंत येणाऱ्या अडचणीसाठी फोन करण्यास सांगितले.
भरतीसाठी दिल्ली गाठेन
गेल्या वर्षीची भरती कोरोनामुळे रद्द झालीये. यंदा या पोरांचा खोळंबा नको असे खासदार श्रीनिवास पाटील म्हणताच समोरून कलेक्टर म्हणाले किमान चार-पाच जिल्हे मिळून सत्तर हजार मूल येतील कोल्हापूरला साहेब तेव्हा कशी भरती घेणार. लगेच खासदार पाटील म्हणाले प्रत्येक जिल्ह्याची रोज फक्त पाच-पाच हजार पोरचं बोलवा. पण भरती घ्यावीच लागेल, त्यासाठी मी दोन दिवसात दिल्ली सुद्धा गाठेन.
यानंतर नुकतीच खासदार श्रीनिवास पाटील यांनी रक्षाप्रमुख जनरल बिपीन रावत यांची भेट घेतली. कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणची सैनिक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे तरूणांचे सैन्यात जाण्याचे स्वप्न धोक्यात असून दिवसेंदिवस त्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. अशा इच्छुक युवकांची संधी हिरावू नये यासाठी भारत सरकारने खासबाब म्हणून या वर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्यासह रक्षाप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडे केली. खा.पाटील हे लोकसभा अधिवेशनानिमित्त दिल्ली येथे असून त्यांनी यासंदर्भात प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group