नवी दिल्ली । स्टाफ सिलेक्शन कमिशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. नव्या तारखा कधी घोषित केल्या जाणार हे यात नमूद करण्यात आले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे.
या परिपत्रकात SSC CHSL 2019 टियर १ परीक्षा, SSC JE 2019 पेपर १ परीक्षा, SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी २०१९ परीक्षा आणि SSC CHSL 2019 स्कील टेस्ट या परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
या परिपत्रकात जारी केलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की १ जून २०२० रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करेल. परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा १ जूननंतरच करणार आहे.
अधिकृत परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”