हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून उद्या म्हणजेच 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
कुठे पाहाल निकाल-
दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळ वापरा-
1) mahresult.nic.in
2)www.sscresult.mkcl.org,
3) www.maharashtraeducation.com
दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 मुले तर 7 लाख 49 हजार 487 मुलींचा समावेश आहे.