Bank FD Rates : ‘या’ मोठ्या बँकांकडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD Rates : एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा, SBI किंवा आयडीबीआय बँके च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सर्व बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. SBI कडून आपल्या निवडक फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली आहे, तर IDBI बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात 25 बेस पॉईंट्सने वाढ केली आहे.

Want to Save In Bank FD? Here Are Best Interest Rates Offered By Banks

हे लक्षात घ्या की, RBI ने अलीकडेच आपल्या रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ केली होती. ज्या नंतर अनेक बँकांनी आपल्या FD च्या आणि ग्राहक कर्जाच्या दरात वाढ झाली ​​आहेत. SBI ने 15 जूनपासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी 0.20 टक्क्यांनी व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या निवडक मुदतीच्या देशांतर्गत बल्क FD च्या व्याजदरात 75 बेस पॉइंट्सने वाढ केली गेली आहे. बँकेने MCLR सुद्धा 0.20 टक्क्यांनी वाढवला आहे. Bank FD Rates

SBI vs Canara vs Kotak vs Yes Bank: Check Current Interest Rates On FD Here  - Goodreturns

IDBI बँकेने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिटेल FD वरील व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 15 जूनपासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. बँकेने आता 91 दिवसांपासून सहा महिन्यांपर्यंतच्या रिटेल FD वरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवून चार टक्के केला आहे. तसेच तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युर होणाऱ्या FD वर, बँक 5.60 टक्के दराने व्याज देईल, तर पूर्वी बँक 5.50 टक्के दराने व्याज देत होती. ग्राहकाला आता पाच वर्षे ते सात वर्षांपर्यंतच्या रिटेल FD वर 5.75 टक्के व्याज मिळेल. Bank FD Rates

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD  Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

त्याचप्रमाणेच, एचडीएफसी बँकेनेही FD वर जास्त व्याजदर देण्याचे जाहीर केले आहेत. आता HDFC बँकेकडून ग्राहकांना 33 महिन्यांत FD वर 6.75 टक्के आणि 99 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर 7.05 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेने 50 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या बचत खात्यांवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना, ज्यांचे बचत खाते 50 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना 4 टक्के दराने व्याज मिळणार आहे. Bank FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्याhttps://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या !!!

Kisan Vikas Patra : ‘या’ सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट पैसे !!!

‘या’ 8 मार्गांनी Social Media वर स्वतःला ठेवा सुरक्षित !!!

EPFO मध्ये ई-नॉमिनेशन कसे करावे ते जाणून घ्या

Recharge Plans : एका महिन्याची व्हॅलिडिटी असलेले ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स तपासा

Leave a Comment