हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहे. त्यामुळे सगळे विद्यार्थी कसून अभ्यासाला लागलेले आहेत. तसेच शाळा देखील त्यांच्या पातळीवर विद्यार्थ्यांकडून योग्यरित्या तयारी करून घेत आहेत. अशातच आता या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जी बातमी वाचून नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच गणित या विषयाची खूप भीती वाटते. कारण गणित विषयाचा पेपर आला की, तो खूपच अवघड जातो. यामध्ये पाठांतर करावे लागत नाही. परंतु योग्य बुद्धीचा वापर करून हा पेपर द्यावा लागतो. परंतु अनेक विद्यार्थ्यांना 35 मार्क्स मिळवून काठावर पास होणे जमत नाही.
त्याचप्रमाणे दहावीमध्ये गेल्यावर विज्ञान हा विषय देखील आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना अवघड गेल्याचे दिसत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या बोर्डाचे निकाल पाहिले, तर त्यातील गणित आणि विज्ञान या विषयाला कमी मार्क दिसतात. आता याच दोन विषयांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थ्यांना देखील पास केले जाणार आहे. गणित आणि विज्ञान या विषयात तुम्हाला जर 20 पेक्षा जास्त मार्क्स असतील, तरी देखील तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता. आणि तुमच्या निकालावर पास असा शेरा येणार आहेत.
परंतु जर तुम्हाला गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी गुण असतील, तर तुम्हाला या दोन विषयावर आधारित पुढे अकरावीत प्रवेश घेता येणार नाही. तर तुम्हाला गणित आणि विज्ञान या विषयावर आधारित उच्च शिक्षण करायचे, असेल तर तुम्हाला या परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. परंतु ज्यांना या विषयावर आधारित करिअर करायचे नाही. त्यांच्यासाठी ही अत्यंत चांगली बातमी आहे. त्यामुळे आता गणित आणि विज्ञान विषयाची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून कमी होणार आहे. आणि आता त्यांना इतर विषयांचा चांगला स्कोर करता येणार आहे.
यासंदर्भात शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले की, “हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक निर्णय आहे. आपल्याला पदवीधरांची संख्या वाढवायचे आहे का की गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचे आहे. हे एकदा शासनाने ठरवले पाहिजे. जागतिक पातळीवर जे अभ्यास येतात. त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा ठरवला जातो. यामध्ये 2020 साली भारत 33 व्या क्रमांकावर होता. इथून पुढे तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळणार आहे. यांनी यासाठी विज्ञान आणि कधी विषय अतिशय महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना फक्त पास करण्यापेक्षा जास्त ज्ञान आणि कौशल्य देण्याचा प्रयत्न करा. सरकारला फक्त परीक्षा सोप्प्या करून निकाल वाढवायचे असेल तर माझी सूचना आहे की, जन्म दाखल्याबरोबर पदवीचे प्रमाणपत्र द्यावी. याचे कारण की, आपल्याकडे वेगवेगळे सर्वे जोतात. त्या मध्ये पदवी घेऊनच साधा अर्ज लिहिता येत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. गणितात पास करण्याकरिता गणिताची गोडी कशी लागेल.अशा पद्धतीने शिक्षण पद्धती करा.”